Friday, September 21, 2018

Sur Tech Chedita.............

नमस्कार मंडळी .....

   सूर तेच छेडीता .......

तुमच्यासाठी घेऊन येत आहे

सुंदर मराठी कवितांचा, गाण्यांचा नजराना 

यामध्ये असतील अनेक कवींच्या कवितांचा अविष्कार कि ज्या तुम्हाला भावतील आणि तुमच्या मनातील कविमन जागे करतील...


            ज्येष्ठ कवी मंगेश केशव पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी कोकणातील वेंगुर्ले येथे झाला.  ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ यासारख्या एकापेक्षा एक लोकप्रिय गाण्यांचे गीतकार कवी मंगेश पाडगांवकर आहेत. दुबईमध्ये झालेल्या दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद पाडगावकर यांनी भुषविले होते.
            जिप्सी’ (१९५२), ‘छोरी’ (१९५४), ‘उत्सव’ (१९६२), ‘विदुषक’ (१९६६), ‘सलाम’ (१९७८), ‘गझल’ (१९८३), ‘भटके पक्षी’ (१९८४), ‘बोलगाणी’ (१९९०) हे पाडगावकर यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. मीरा, कबीर आणि तुलसीदास यांच्या कवितांचे भावानुवादही पाडगावकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले होते. ‘भोलानाथ, ‘बबलगम’, ‘चांदोमामा’ हे त्यांचे बालकविता संग्रह प्रसिद्ध आहेत. १९६४ मध्ये प्रकाशित झालेला ‘वात्रटिका’या कवितासंग्रहाने पाडगावकर यांची एक वेगळी ओळख करुन दिली. 
             तब्बल ७० वर्षे मराठी साहित्यरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या मंगेश पाडगावकर यांचे दि. ३० डिसेंबर २०१५ रोजी निधन झाले. पण आजही त्यांची गाणी, कविता आपल्या ओठांवर आल्याखेरीज रहात नाहीत. या थोर कवींना सूर तेच छेडीता टीम तर्फे प्रणाम . 

जीवन म्हणजे दोन घडीचा डाव. जीवन हे  एक संघर्ष आहे. जीवन म्हणजे ऊन सावलीचा खेळ.

पण सर्वानाच

एवढ्याश्या जीवनात खुप कही हवे असत,

आणि आपल्याला हव असत तेच मिळत नसत,

तरीही आपल्याला हव ते मिळाले तरी  खुप काही कमी असत,

चांदण्यानी भरून सुद्धा आभाळ आपल रिकाम असत.


पण हे कोणी समजून घेत नाही की जीवन हे एक अनुभवप्रवाह आहे याअनुभवातुनच आपण काही शिकायचे असते आणि पुढे पुढे चालायचे असते यासाठी कवि मंगेश पाडगावकर यांच्या लेखनीतून साकारलेले  आणि गायक श्री अरुण दाते यांनी स्वरबद्ध केलेले हे गीत मनाला खुपच भिडून जाते